Thursday, November 14, 2019

बिरसा मुंडा जयंती

*आज दि.15/11/2019 ला जि.प.प्राथमिक शाळा बिरसी येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.*
*या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.केशरीलाल पटले अध्यक्ष शा.व्य.सं.हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.पुष्पाताई सोयाम ग्रा.पं.सदस्य,सौ.प्रेमिकाताई सोयाम,वच्छलाताई उईके,श्री.एम.सी.मेळे मुख्याध्यापक, सौ.वर्षाताई बावनथडे, कु.सुनीता टेकूळे,कु.सोनाताई रहांगडाले, श्री.विकास लंजे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एम.सी.मेळे सर, संचालन विकास लंजे तर आभार सुनीता टेकूळे यांनी मानले.*

Wednesday, October 16, 2019

NSP SCHOOL REGISTRATION

NSP स्कूल रेजिस्ट्रेशन व नोडल ऑफिसर कसे नेमावे यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी. 
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र राज्य 

https://drive.google.com/file/d/1Gh9by2F-aVeOlh3Q0qAAi4fSPmDJkb_0/view?usp=drivesdk

याप्रमाणे कृती करावी. 
धन्यवाद !!

Saturday, October 5, 2019

5 वी व 8 वी शिष्यवृत्ती फॉर्म भरणे

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी

सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह
https://drive.google.com/file/d/1dLvtiNq5Y3KGahwgHLnWJSZnvJOecVzV/view?usp=drivesdk

Friday, October 4, 2019

Back date mdm कसे भरावे

मित्रानो आपल्या मागील दिवसाचे mdm भरायचे राहिले असल्यास पुढीलप्रमाणे कृती करावी. 
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह
https://drive.google.com/file/d/1R9MUpeRLivtOPRsnOgp4yXtDEZJ2ABhj/view?usp=drivesdk

Wednesday, October 2, 2019

माझे सत्याचे प्रयोग

आजच्या महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने वाचा महात्मा गांधीजीचे आत्मचरित्र
सौजन्य - आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
https://drive.google.com/file/d/1c4r5U9tK-PlCZlMt0b14lLvaNypXIbm3/view?usp=drivesdk

Thursday, September 26, 2019

SWEEP मतदार जागृती

*आज दि. 26/09/2019 ला जि.प.प्राथमिक शाळा बिरसी येथे मतदार जागृती SWEEP या कार्यक्रमांतर्गत नव मतदार व ज्या 4 स्त्रिया लग्न होऊन बिरसी येथे आल्या त्यांचे नाव बिरसी येथील मतदार यादित समाविष्ट झाले त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. त्याचप्रमाणे 8 मुली ज्या या वर्षी प्रथमच मतदान करणार आहेत, त्यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. त्याच वेळेस मतदार यादिचे वाचन सुद्धा करण्यात आले.*
*या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.एम.सी.मेळे सर,तर प्रमुख पाहुणे म्हणून  प्रा.ठाकूर सर, प्रा.अशोक बोरकर सर भवभूती महाविद्यालय आमगाव,श्री.पि.के.चौधरी माजी सरपंच बिरसी,  सौ.वर्षा बावनथडे,कु.सुनीता टेकुळे,श्री.विकास लंजे तसेच सर्व भवभूती महाविद्यालय व बिरसी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.*
*या प्रसंगी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गावामध्ये जाऊन गावातील प्लास्टिक कचरा गोळा केला, शाळेच्या आवाराची स्वच्छता केली तसेच कुटुंब सर्वेक्षण करून विविध शासकीय योजनेचे माहिती दिली.* 
*त्यानंतर नवीन मतदार याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे संचालन श्री.विकास लंजे तर आभार सौ. वर्षा बावनथडे यांनी मानले*





Monday, September 16, 2019

वृत्तपत्र बातमी

जि.प.प्रा.शाळा बिरसी येथील वर्तमनपत्रात आलेली बातमी



Friday, September 6, 2019

शिक्षक दिन

आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शाळेत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.







Thursday, August 22, 2019

Google form

Google form वर quizzes बनविणे 
मार्गदर्शक - श्री. भालचंद्र भोले सर 
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह 
खालील लिंक वर क्लीक करा 
https://drive.google.com/file/d/18UstkFz373VLL2MRBj7hbRrXfboSbVvG/view?usp=drivesdk

Thursday, August 15, 2019

स्वातंत्र्य दिन

*आज दि.15/08/2019ला जि.प.प्राथमिक शाळा बिरसी येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.*

*या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संदिपजी बावनथडे पोलीस पाटिल बिरसी तर ध्वजारोहक श्री.केशरीलाल पटले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बिरसी तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शाळेचे तथा अंगणवाडी येथील विद्यार्थी  होते.*

*सर्व प्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.फ़ॉरेस्ट ऑफिस बिरसी येथील ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व उपस्थित व्यक्ती बिरसी शाळेच्या पटांगणावर जमले.*
*मा.केशरीलालजी पटले यांनी ध्वजारोहन केला.यानंतर उपस्थित नागरीकाककडून तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.*

*शाळेतील विध्यार्थ्यानी नृत्य, भाषण व देशभक्तीपर गीत सादर केले.*

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. एम.सी.मेळे सर तर संचालन श्री. विकास लंजे तर आभार सौ.वर्षा बावनथडे यांनी मानले.*

*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.सुनीता टेकूळे, कु.सोना रहांगडाले व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.*



अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा पहा सविस्तर 
सौजन्य - तंत्रस्नेही ग्रुप समूह 

Minority School registration
यावर क्लिक करा 

Wednesday, July 17, 2019

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा संधर्भात

*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा- 2020*

सर्व शिक्षक,पालक व विदयार्थ्याना कळविन्यात येते की,
सन 2019-20 या वर्षात वर्ग 5 वीत शिकत असणारे विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय प्रवेशाची सुवर्ण संधी
*या वर्षी प्रवेश अर्ज हे पुर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच भरले जाणार आहेत.हे अर्ज नजीकच्या सायबर केफे,शाळेतील संगणकाद्वारा,मोबाईल वरून सुद्धा भरता येतील.
    प्रवेश अर्ज भरण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही,हे अर्ज
https://www.nvsadmissionclasssix.in/nvs6reg/homepage
लिंक वरून अपलोड करता येतील.
यासाठी खालील बाबीची आवश्यकता लागणार आहे. - विदयार्थ्याचा फोटो(jpg.format),विदयार्थ्याची व पालकाची सही(scan केलेली) , वर्ग 5 वीत शिकत असलेल्या शाऴेतील मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यात सर्टिफिकेट इत्यादी.
विस्तृत माहितीसाठी Notification पहावे किंवा जवाहर नवोदय विद्यालय,नवेगाव बांध जिल्हा गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा
वरील माहिती ही विद्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख *15 सप्टेंबर 2019* ही आहे. प्रवेश परीक्षा
 दि. *11जानेवारी 2020* ला होईल.

 अधिक माहिती करिता संपर्क-
9423424369-केदार (शिक्षक)
9422536138-एम.एस.बलवीर प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय ,नवेगाव बांध जिल्हा-गोंदिया


Monday, July 8, 2019

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 1

विदयार्थी मित्रानो आपण परिपाठात दररोज सामान्य ज्ञानावर  आधारित प्रश्न विचात असतो. त्या प्रश्नावर आधारित चाचणी आपण दर सोमवारी घेणार आहोत.
सामान्य ज्ञानावर आधारित चाचणी क्र. 1

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeqTK_dj3GyTP8LBmF9Ow7qN48RdisFdAACIAKmUAI_Fdp6zg/viewform?usp=sf_link

Thursday, June 27, 2019

शाळा प्रवेशोत्सव

आज दि. 26/06/2019 ला जि. प. प्रा.शाळा बिरसी येथे *"सामाजिक न्याय दिन शाळा प्रवेशोत्सव,नवागतांचे स्वागत, पुस्तकं वाटप कार्यक्रम"* घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष *श्री.बोपचे सर से.नि.शिक्षक* हे होते, तर प्रमुख उपस्थितीत *श्री. केशरीलाल पटले* अध्यक्ष शा.व्य.स. बिरसी, *सौ. रहांगडाले* उपाध्यक्षा, *सौ.ममताताई पटले, सौ.रीता जोशी, सौ. ज्योती चौधरी, सौ. छाया सोनवाने सदस्य  शा.व्य.समिती बिरसी,श्री. सोनवाने सर, श्री.अग्रवाल सर से.नि.शिक्षक, श्री.पि.के.चौधरी,श्री.प्रल्हाद चौधरी माजी सरपंच, सौ.उर्मिला बावनथडे* हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे *मुख्याध्यापक श्री.एम.सी.मेळे सर* यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन *श्री.विकास लंजे* तर आभार *वर्षाताई बावनथडे* यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी *कु.सुनीता टेकूळे, सोनाताई रहांगडाले* यांनी सहकार्य केले.


Saturday, June 22, 2019

Flipbook इयत्ता 1 ली ते 10 वी

इयत्ता पहिली ते दहावी सर्व क्रमिक पुस्तकांचे flipbook
सौजन्य - महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह

https://drive.google.com/file/d/1xrtS46GTdWIoyuyrHF-bNfg2x1RHUCnv/view?usp=drivesdk

Friday, June 21, 2019

आंतरराष्ट्रीय योग दिन


आज दि. 21 जून 2019 ला जि.प.प्रा.शाळा बिरसी येथे श्री.केशरीलालजी पटले यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख आमगाव श्री.एम.सी.मेळे,श्री.पि.के.चौधरी माजी सरपंच, वर्षा बावनथडे, सुनीता टेकूळे, ममता पटले व विद्यार्थी उपस्थित होते.





https://photos.app.goo.gl/WLCpYe7ndNaGbY2s5

Sunday, June 16, 2019

संपूर्ण योग अभ्यास

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन या निमित्ताने आपल्या सर्वाना घेऊन येत आहोत 
आजचे pdf पुस्तक संपूर्ण  योग मार्गदर्शिका 

https://drive.google.com/file/d/1M0T3Ytw451yS8UtRM2OCBgnufwlbscix/view?usp=drivesdk 

Friday, June 14, 2019

अण्णा हजारे

आज पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे यांना  हार्दिक शुभेच्छा !!!

आजचे पीडीएफ पुस्तक   : पद्मभूषण अण्णा हजारे

लेखन  : विकीपेडिया
https://drive.google.com/file/d/1zqFWgWNWO41AH8eG0ZJHMt1Hs23RnFho/view?usp=drivesdk

Monday, June 10, 2019


आजचे पीडीएफ पुस्तक   : श्यामची आई   (आत्मकथन ) 

लेखन  : साने गुरुजी 

https://drive.google.com/file/d/1daxP51N7cZGr2AkkTb2DoP7uCbGHyajU/view?usp=drivesdk

Wednesday, May 22, 2019



आजचे पीडीएफ पुस्तक   : चिंता सोडा सुखाने जगा 

लेखन      : डेल कार्नेजी 

मराठी अनुवाद - ॲड शुभदा विद्वांस
https://drive.google.com/file/d/1D14ghP7FNadYmSoCOvdwbbJgRV5XS8Xo/view?usp=drivesdk

Tuesday, May 21, 2019

बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे

सुट्टी चा सदुपयोग 
वाचा आजचे pdf पुस्तकं
बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे 
 खालील लिंक वर क्लिक करा. 
https://drive.google.com/file/d/197TysJBNf0gOe7vKNG7rLv8A25jDuUVT/view?usp=drivesdk

Friday, May 17, 2019

Thursday, May 16, 2019

उत्कृष्ठ सूत्रसंचालन

आजचे pdf पुस्तकं
उत्कृष्ठ सूत्रसंचालन 
नक्की वाचा

https://drive.google.com/file/d/115cH0xFzyp82R8rKpoIjsGuKurpVSN2F/view?usp=drivesdk

आमचे यश

*जि.प.प्राथमिक शाळा बिरसी चे सुयश* 💐💐💐💐

*फेब्रु. 2019 मध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( वर्ग   5 वी) च्या आज घोषित झालेल्या निकालामध्ये 5 विद्यार्थी पात्र झालेले आहेत.*
*पात्र विद्यार्थी याप्रमाणे* -
*1)अश्विनी दुर्योधन चौधरी*
*2)हिमांशी राजकुमार चौधरी*
*3)गुलशन राजेश हाडगे*
*4)शिवानी मोरेश्वर हरिणखेडे*
*5)चिरंजीव चंद्रकुमार बिसेन*
               
       पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक *श्री.एम.सी.मेळे सर, सहशिक्षक कु.सुनीता टेकूळे, सौ.वर्षाताई बावनथडे, श्री.विकास लंजे* यांनी अभिनंदन केले.

Wednesday, May 1, 2019

महाराष्ट्र दिन

दिनांक 01 मे महाराष्ट्र दिन साजरा करतांना जि. प. प्रा. शाळा बिरसी. 



Tuesday, April 30, 2019

*जि.प.प्राथमिक शाळा बिरसी येथे उन्हाळी अभ्यास करतांना विद्यार्थी*




Sunday, April 28, 2019

भौतिक सुविधा माहिती प्रपत्र डाउनलोड करण्यासाठी 
https://drive.google.com/file/d/1yRe27HX4W6T0cygq_rpbBMHdJc6OYdWz/view?usp=drivesdk

या लिंक वर जावे.

fliipbook

शाळेतील राबिवण्यात येणारे विविध उपक्रमाची flipbook आपण खालील लिंक द्वारे बघू सकता 

- धन्यवाद 



http://online.fliphtml5.com/yppk/fygt/
सूचना 
  सर्व विद्यार्थी व पालकांना सूचित करण्यात येते की, इयत्ता 1 ते 5 वी सण 2018-2019 चा वार्षिक निकाल दि. 01 मे 2019 ला सकाळी 10.00 वाजता शाळेच्या ब्लॉग birsiprimaryschool.blogspot.com 
वर जाहीर करण्यात येईल.
सर्वांनी नोंद घ्यावी.
           
                                               आदेशानुसार
                                              मुख्याध्यापक 
                                     जि.प.प्राथमिक शाळा बिरसी 
                                     प.स.आमगाव जि.प.गोंदिया 

टिप - 
आपण आपले गुणपत्रक व मिळालेले संकलित गुण प्रिंट काढू सकता. 

Saturday, April 27, 2019

इयत्ता पाचवी 
विषय - इंग्रजी 
Poem - Good Morning 
https://youtu.be/lV8SQ2gt46U

आमचे वाढदिवस

💐💐💐💐💐💐💐💐   *आमचे वाढदिवस व आमचे उपक्रम*  💐💐💐

आज दि.05/03/2019 ला *जि.प.प्रा.शाळा बिरसी* येथे मुख्याध्यापक  *श्री.एम.सी.मेळे सर* यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम अंतर्गत
🖋🖋 *इयत्ता 3 री ते 5 वी तील सर्व विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.*
 🖋🖋   *इयत्ता 1 ली व 2 री च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.*
🖋🖋   *संन 2019-2020 च्या इयत्ता पाहिलीत दखलपात्र 10 विद्यार्थी यांचा शाळा प्रवेश करण्यात आला.*
   🖋🖋      *कॉन्व्हेंट मधून इतर वर्गात प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात आला.*

🌹🌹  *सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कटरे सर विषय साधन व्यक्ती आमगाव तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.ममताताई पटले उपाध्यक्ष शा.व्य.स., श्री.पी.टी.पटले सर केंद्रप्रमुख, श्री.बोपचे सर,जिभकाटे मॅडम, वैद्य मॅडम, खापर्डे सर विषय साधन व्यक्ती आमगाव, सौ. सारिकताई पटले,तसेच शिक्षक सौ.वर्षाताई बावनथडे,कु.सुनीता टेकुळे,कु.सोनाताई रहांगडाले, केशरीलालजी पटले उपस्थित होते.*

🌹🌹  *सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी श्री.एम.सी.मेळे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांनी वाढदिवसानिमित्त राबिवलेल्या उपक्रमाची स्तुती केली.*

🌹🌹    *आजच्या उपक्रमांतर्गत स्पर्धेत  सर्व वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना सरांनी बक्षीस दिले.*

🌹🌹  *नेहमी सहकार्य करणाऱ्या शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला.*

🌹🌹  *शाळेतील सर्व शिक्षकांना भेटवस्तू   देऊन त्यांच्या कार्यांचा गौरव केला.*

🌹🌹 *इयत्ता पहिल्या वर्गात दाखल केलेल्या पालक व विध्यार्थी यांचा सत्कार केला.*

    🌹🌹 *कॉन्व्हेंट मधून बिरसी शाळेत दाखल करू इच्छिणाऱ्या पालकांचा सत्कार केला.*

*कार्यक्रमाचे संचालन श्री.विकास लंजे तर आभार सौ.वर्षाताई बावनथडे यांनी मानले*
*यानंतर सर्वांनी गोड जेवण घेतले* 

*अशाप्रकारे श्री.एम.सी.मेळे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला*



*आज दि. 06/04/2019 ला जि. प.प्रा.शाळा बिरसी येथे गोंदिया जि.प. चे अभिनव उपक्रम "गुढीपाढवा- शाळा प्रवेश वाढवा" हा कार्यक्रम घेण्यात आला.*

*या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.केशरीलालजी पटले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.एम.सी.मेळे सर, पालक सौ.सोनवाणेताई शिक्षक सौ.वर्षाताई बावनथडे, कु.सुनीता टेकूळे, श्री.विकास लंजे, अंगणवाडी सेविका उमनताई रहांगडाले, मदतनीस ममता पटले, इयत्ता पहिलीला  भरती झालेले 16 विद्यार्थी तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मेळे सर यांनी केले. त्यात शाळेतील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमाची माहिती उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना करून दिली.*

*अध्यक्षीय भाषणात श्री. केशरीलाल पटले यांनी शाळेतील उपस्थिती व प्रवेश वाढविण्यासाठी कॉन्व्हेंट मध्ये जाणाऱ्या पालकांची भेट घेऊन त्यांच्या शिक्षण विषयी अपेक्षा पूर्ण करून त्या विद्यार्थ्यांना शाळेत भरती करण्यासाठी सहकार्य  करू अशी ग्वाही दिली.*

*इयत्ता पाहिलीत भरती झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ,  वही, पेन्शील व पाठ्यपुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे संचालन श्री. विकास लंजे तर आभार वर्षा बावनथडे यांनी मानले.*

*सर्वाना गोड पदार्थ वाटप करून गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.*

DIECPD

*You are on the right track*
-  *Sandip Somwanshi*
    *DIECPD Gondia*

  आज दि. *16/03/2019* ला *जि.प.प्रा.शाळा बिरसी* येथे DIECPD गोंदिया चे *गणित* विषय सहाय्यक *श्री.संदिप सोमवंशी सर व सुभाष महारवाडे सर* यांनी बिरसी शाळेला भेट दिली.
सर्व इयत्ता *पहिली ते पाचवी वर्गातील* सर्व मुलांची निरीक्षण केले.
सर्व मुलांची प्रगती पाहुण त्यांना आनंद झाला.
इयत्ता तिसरी वर्गातील मुलांनी त्यांना *व्यापार* हा खेळ खेळून दाखविला.
इयत्ता तिसरी तील विद्यार्थीनी *कशिश खोब्रागडे* हिने *अबॅकस* द्वारे संख्या वाचून दाखविल्या.
इयत्ता चौथी तील विद्यार्थ्यांनी *खेळाद्वारे संख्या तयार करून वाचन केल्या*, *अपूर्णांक वाचन व लेखन* करून दाखवले.
*इयत्ता पाचवी* च्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती वर आधारित छोटी चाचणी घेतली त्यात *भागाकार, अपूर्णांक व मापन* यावर आधारित होती.
 ह्या सर्व *activities व त्यावर मिळालेला प्रतिसाद* बघून सरांनी  विद्यार्थी व शिक्षक यांच्या मेहनती ची प्रशंसा केली व
*YOU  ARE ON RIGHT TRACK असा शेरा दिला.*


*शब्दांकन*
*श्री.विकास लंजे*
*जि.प.प्रा.शाळा बिरसी*




उन्हाळी वर्ग

*आम्ही तंत्रस्नेही*

*जि.प.प्रा.शाळा बिरसी येथे उन्हाळी वर्ग अंतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना laptop हाताळण्याचे प्रशिक्षण व माहिती देताना.* *कु.सुनीता टेकुळे मॅडम व सौ. वर्षाताई बावनथडे  मॅडम व उपस्थित विद्यार्थी.*
*सोबत आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख व बिरसी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम.सी.मेळे सर व शिक्षक विकास लंजे.*
इयत्ता 1 ली ते 5 वी प्रवेश देणे सुरु आहे. फक्त निवडक जागा उपलब्ध