Sunday, May 29, 2022

शाळा पूर्व तयारी मेळावा पहिला

 *आज दि.18/04/2022 ला जि. प. प्रा. शाळा बिरसी येथे शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.*


*प्रभातफेरी*

या मेळाव्याची सुरुवात सर्वप्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.


*मेळाव्याचे उदघाटन*


या मेळाव्याचे उदघाटन गावातील जेष्ठ नागरिक व माझी सरपंच *श्री. पि. के. चौधरी* यांच्या हस्ते करण्यात आली. कर्यक्रमच्या अध्यक्ष *मा. केशरीलाल पटले अध्यक्ष शा. व्य. स. प्रमुख पाहुणे मा. नागोराव सोनवाने अध्यक्ष से.सह.सो. बिरसी, मा. देवचंद सोनवाने, मा. सत्यकला रहांगडाले उपाध्यक्ष, मा. चंद्रकला ताई बिसेन सदस्य शा. व्या. स., मा. एम. सी. मेळे मुख्याध्यापक, कू. सुनीता टेकूळे, सौ. वर्षा बावनथडे* होत्या.


कार्यक्रम *प्रास्ताविक* मा. एम. सी. मेळे यांनी केले व उपस्थित माता पालक, विद्यार्थी यांना कार्यक्रमाची रूपरेषा व असणारे विविध स्टॉल व प्रत्येक स्टॉल वर असणारे साहित्य व त्याद्वारे विद्यार्थी प्रगती जाणून घेऊन 12 आठवड्याची कृतिपत्रिका यांची माहिती देण्यात आली.


कार्यक्रमाचे संचालन *श्री. विकास लंजे* तर आभार *सौ. वर्षा बावनथडे* यांनी मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी *उमनताई रहांगडाले, कविता खोब्रागडे, ममता चौधरी, सिंधुताई रहांगडाले, झूलेश्वरी रहांगडाले, पूनम सोनवाने, स्वेजल मेळे, संध्या अंबुले, सलोनी रहांगडाले, प्रवीण चौधरी, अनिता पंधरे, मीरा खुळसुंगे व सर्व विद्यार्थ्यांनी* सहकार्य केले.


यानंतर सर्व उपास्थितीतांना गोड जेवण देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. या शाळांपूर्व तयारी मेळाव्यात एकूण *18 विद्यार्थी व त्यांचे पालक* यांनी सहभाग घेतला.








No comments:

Post a Comment