Sunday, May 29, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

 *प्रत्येकाने संविधान वाचन केले पाहिजे* - मा. केशरीलाल पटले



   आज दि.14/04/2022 ला जि. प. प्राथ. शाळा बिरसी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. केशरीलाल पटले अध्यक्ष शा. व्य. स. तर प्रमुख पाहुणे मा. चंद्रकला बिसेन सदस्य शा. व्य. स., मा. एम. सी मेळे मुख्याध्यापक, सहशिक्षक कू. सुनीता टेकूळे, वर्षाताई बावनथडे, विकास लंजे, पालक सिंधुताई रहांगडाले, ममताताई चौधरी उपस्थित होते.


याप्रसंगी विदयार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भाषण दिले. काहींनी गीत म्हंटले काहींनी चित्र काढले. सहभागी सर्व विदयार्थ्यांना वही व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. एम. सी. मेळे सर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मा. केशरीलाल पटले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाचे वाचन करून आपले अधिकार व कर्तव्य जाणून एक चांगले नागरिक होऊन आपला देश प्रगतीपतावर नेण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.


कार्यक्रमाचे संचालन विकास लंजे तर आभार सुनीता टेकूळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.







No comments:

Post a Comment