आजची pdf पुस्तकं
अंतरीक्ष दर्शन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी पं.स. आमगाव जि.प. गोंदिया चे हे अधिकृत ब्लॉग आहे. यात आमच्या प्राथमिक शाळेत राबिवण्यात येणारे वेगवेगळे शैक्षणिक ,सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम तसेच तंत्रज्ञानाविषयक बाबीं सर्वाना माहिती करण्यासाठी तयार करण्यात आला आहे . धन्यवाद !!!! !! एकच ध्यास गुणवत्ता विकास !!
आज दिनांक 21ऑक्टोबर 2022 ला शालेय बालसभेत दिवाळीनिमित्त आकाशकंदिल तयार करणे हा विषय घेण्यात आला यात विकास लंजे सर यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदिल तयार करून दाखवले तसेंच इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मातीचे दिवे व वस्तू तयार केल्या.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मेळे सर, शिक्षिका कू. टेकूळे मॅडम, सौ. बावनथडे मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=474984481323510&id=100064358851717&mibextid=Nif5oz
आज दि.26/11/2022 ला *जि. पं. प्राथ. शाळा बिरसी* येथे *संविधान दिन* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संविधान दिनानिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, संविधान प्रास्ताविक वाचन या स्पर्धा घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पूनमताई सोनवाने अध्यक्ष शा. व्य. स. बिरसी, प्रमुख पाहुणे म्ह्णून गावाचे प्रतिष्ठित नागरिक मुन्नालालजी पटले, सदस्य मा. गंगाताई रहांगडाले, झूलेश्वरिताई रहांगडाले, शिलताई बहेकार, सुनिताताई सोनवाने,मा. चौरे सर, शाळेचे मुख्याध्यापक मा. मेळे सर, शिक्षक मा. वर्षाताई बावनथडे, विकास लंजे, सिंधुताई रहांगडाले, मा. उमनताई रहांगडाले अंगणवाडी सेविका, मा. ममताताई चौधरी अंगणवाडी मदतनीस व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मेळे सर यांनी केले. संचालन विकास लंजे व आभार मा. वर्षाताई बावनथडे यांनी केले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=501688558653102&id=100064358851717&mibextid=Nif5oz
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले भाषण, चित्र, गीत गायन, रांगोळी काढल्या.
यानंतर गावातील *इयत्ता 1 ते 3 री पर्यंतच्या माता पालक* यांच्या सर्व गटाच्या *आढावा सभा* मा. पूनमताई सॊनवाणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बिरसी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या आढावा सभेत माता पालक गटांना निपुण भारत अंतर्गत येणारे सर्व विडिओ व करावयाच्या कृतीचे आढाव घेण्यात आला. तसेच मा. मेळे सर, वर्षा बावनथडे मॅडम, विकास लंजे सर यांनी करवयाच्या कृती सांगितल्या व आपापल्या बालकाची प्रगती राखण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करणार याची ग्वाही देण्यात आली.तसेंच गटातील अडचणी सोडविण्यात आल्या.
या प्रसंगी सर्व माता पालक गटाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
त्याप्रसंगीचे छायाचित्र
💐💐*पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 इयत्ता पाचवी*💐💐
*जि.प. प्राथ. शाळा बिरसी येथील _सहा_ विद्यार्थी पात्र*
1) प्रतिक हिवराज मानकर
2)मुस्कान नरेश रहांगडाले
3)निहाल मनोज अंबुले
4)सेजल सुभाष नांदगाये
5)पलक राजकुमार चौधरी
6)प्राची प्रवीण चौधरी
पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन
💐💐💐💐
मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद
जि. प. प्राथ. शाळा बिरसी
*प्रत्येकाने संविधान वाचन केले पाहिजे* - मा. केशरीलाल पटले
आज दि.14/04/2022 ला जि. प. प्राथ. शाळा बिरसी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. केशरीलाल पटले अध्यक्ष शा. व्य. स. तर प्रमुख पाहुणे मा. चंद्रकला बिसेन सदस्य शा. व्य. स., मा. एम. सी मेळे मुख्याध्यापक, सहशिक्षक कू. सुनीता टेकूळे, वर्षाताई बावनथडे, विकास लंजे, पालक सिंधुताई रहांगडाले, ममताताई चौधरी उपस्थित होते.
याप्रसंगी विदयार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भाषण दिले. काहींनी गीत म्हंटले काहींनी चित्र काढले. सहभागी सर्व विदयार्थ्यांना वही व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. एम. सी. मेळे सर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मा. केशरीलाल पटले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाचे वाचन करून आपले अधिकार व कर्तव्य जाणून एक चांगले नागरिक होऊन आपला देश प्रगतीपतावर नेण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन विकास लंजे तर आभार सुनीता टेकूळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

*आज दि.18/04/2022 ला जि. प. प्रा. शाळा बिरसी येथे शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.*
*प्रभातफेरी*
या मेळाव्याची सुरुवात सर्वप्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.
*मेळाव्याचे उदघाटन*
या मेळाव्याचे उदघाटन गावातील जेष्ठ नागरिक व माझी सरपंच *श्री. पि. के. चौधरी* यांच्या हस्ते करण्यात आली. कर्यक्रमच्या अध्यक्ष *मा. केशरीलाल पटले अध्यक्ष शा. व्य. स. प्रमुख पाहुणे मा. नागोराव सोनवाने अध्यक्ष से.सह.सो. बिरसी, मा. देवचंद सोनवाने, मा. सत्यकला रहांगडाले उपाध्यक्ष, मा. चंद्रकला ताई बिसेन सदस्य शा. व्या. स., मा. एम. सी. मेळे मुख्याध्यापक, कू. सुनीता टेकूळे, सौ. वर्षा बावनथडे* होत्या.
कार्यक्रम *प्रास्ताविक* मा. एम. सी. मेळे यांनी केले व उपस्थित माता पालक, विद्यार्थी यांना कार्यक्रमाची रूपरेषा व असणारे विविध स्टॉल व प्रत्येक स्टॉल वर असणारे साहित्य व त्याद्वारे विद्यार्थी प्रगती जाणून घेऊन 12 आठवड्याची कृतिपत्रिका यांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन *श्री. विकास लंजे* तर आभार *सौ. वर्षा बावनथडे* यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी *उमनताई रहांगडाले, कविता खोब्रागडे, ममता चौधरी, सिंधुताई रहांगडाले, झूलेश्वरी रहांगडाले, पूनम सोनवाने, स्वेजल मेळे, संध्या अंबुले, सलोनी रहांगडाले, प्रवीण चौधरी, अनिता पंधरे, मीरा खुळसुंगे व सर्व विद्यार्थ्यांनी* सहकार्य केले.
यानंतर सर्व उपास्थितीतांना गोड जेवण देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. या शाळांपूर्व तयारी मेळाव्यात एकूण *18 विद्यार्थी व त्यांचे पालक* यांनी सहभाग घेतला.
जि.प.प्राथ.शाळा बिरसी यांनी राबिवलेले उपक्रम पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा
मराठी
इंग्रजी