Friday, February 26, 2021

कसा होता? जि.प. प्राथ. शाळा बिरसी पं. स. आमगाव येथील विद्यार्थ्यांचा lockdown ते बघा

जि. प. प्राथ. शाळा बिरसी ही उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात नावाजलेली आहे. ह्या वर्षी कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे lockdown लागले आणि शाळा बंद होत्या त्या बंदच्या काळात सुद्धा आमच्या शाळेने विद्यार्थ्यांचा अध्ययन अध्यापनात खंड पडू दिला नाही, हा अभ्यास वेगवेगळ्या उपक्रमनातून करवून घेतला. त्यातील आम्ही राबिवलेले काही उपक्रम आपल्या साठी share करत आहोत. 

1) व्हाट्स ऍप ग्रुप - सर्वप्रथम मुलांचे व्हाट्स ऍप ग्रुप तयार केले. त्या ग्रुपवर विद्यार्थ्यांना करावयाचा घरचा अभ्यास, विविध टास्क, कृती, वाचायला विविध pdf स्वरूपातील पुस्तके, व त्यावर आधारित मूल्यमापन, विविध ऑनलाईन स्पर्धा इत्यादी बाबी नियमित पाठविल्या.

https://chat.whatsapp.com/Fe6kNdcC5m3CK2P8YgBG1n

2) नृत्य स्पर्धा - विद्यार्थ्यांना नृत्य करणे हा आवडीचा विषय आहे म्हूणन आम्ही सर्वांनी इयत्ता नुसार गट तयार केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या गाण्यावर नृत्य विडिओ रेकॉर्डिंग करून ग्रुप वर पाठविले. त्या मधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढला.




3)Online Study Z. P. Gondia - जि. प. गोंदिया आयोजित केलेल्या online study या उपक्रमांतर्गत आलेली लिंक विद्यार्थ्याच्या ग्रुप वर पाठवून त्यांच्याकडून सोडवून घेण्यात आली. 


4) चित्रकला स्पर्धा - विदयार्थ्याना चित्र काढणे आवडतात म्हणून त्यांची चित्रकला स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. त्यामध्ये विषय होता कोरोना विषाणू, covid-19 मुलांनी चित्र काढून व्हाट्स ऍप वर पाठवली त्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढला.








5)भाषण स्पर्धा
 - या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यां

 भाषण विषय देण्यात आले. त्यावर आधारित विद्यार्थ्यांनी भाषण करून विडिओ पाठवला. त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आला.



6) कविता गायन - विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या आवाजात आपल्या वर्गातील कविता गायन करून व्हाट्स ऍप वर पाठविल्या. त्यातील काही कविता खालीलप्रमाणे आहेत.



7)घरातील कामात आईवडिलांना मदत - आपले आईवडील नियमित घरकामे करत असतात म्हूणन विद्यार्थी घरकामात मदत करावी व श्रमप्रतिष्ठा हा गुण रुजवा म्हणून विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांना घरकामात मदत करताना फोटो share करण्यास सांगितले त्यामुळे मुले नियमित आपल्या घरकामात मदत करत होती.






8)थोर व्यक्तीच्या जयंती /पुण्यतिथी कार्यक्रम - विद्यार्थ्यांना दिनविशेष दररोज व्हाट्स ऍप वर पाठवताना त्या त्या दिवसी असणाऱ्या महान व्यक्तीच्या जयंती अथवा पुण्यतिथी ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. विदयार्थ्याना pdf स्वरूपातली माहिती व फोटो पाठवून त्यांनी केलेले कार्य सांगण्यात आले.

9)राष्ट्रिय सण - या वर्षी कोविड विषाणू च्या प्रादुर्भावाने स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत साजरे झाले तरीपण आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरूनच देशभक्ती पर गीता, भाषण करून व्हाट्स ऍप ग्रुप ला पाठवले.

https://drive.google.com/file/d/1WflX6OQH3MByor6OqcqTsRTk8UMemWwV/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1WxQaVtrveHEirjjDhZyGdvNlO1EUIpMc/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1WdN4VL3jcoJLgr2z2NbPP9XmJMtBxRrp/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1Wq-Sv91wBTujNjU5YVNpCabO4V1uUZCt/view?usp=drivesdk



10) गृहभेट - विद्यार्थ्यांना दिलेला अभ्यास, टास्क करतात का तसेच ऑनलाईन अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षक विदयार्थ्यांच्या नियमित गृहभेटी घेऊन social distancing चे पालन करून अभ्यास करून घेत.



11)भरारी -
इयत्ता पाचवी च्या विद्यर्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन तज्ञ शिक्षकांकडून देण्यात येते हे मार्गदर्शन विदयार्थी youtube व zoom ऍप द्वारे नियमित घेतात.


12) होतकरू तरुणांची मदत - गावातील काही हितकरू तरुण मंडळी यांनी आमच्या कार्यात मदत केली यांनी त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाही त्यांना आम्ही दिलेले टास्क पुरावून पाठवले. त्यांनी या कामात आमची फार मदत केली.

13) शाळा प्रवेश लिंक - पालकांना आपल्या पाल्याची शाळा प्रवेश करायची काळजी होती सर्वत्र lockdown होते म्हणून आम्ही आमच्या शाळा प्रवेशाची लिंक उपलब्ध करून दिली. या कामात गावातील तरुण मंडळीची मदत झाली.

https://forms.gle/niShrbXPkFjfzxfk9


14) Zoom meeting - online study च्या कामात zoom ऍप चा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापन करून त्यांच्या अभ्यास घेण्यात आला.






15)Google quizzes - google quizzes च्या माध्यमातून विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्यात आले व गुण देण्यात आले.

https://forms.gle/1DgpNBf3UWMWh3Vf8

16) पालक संपर्क - पालकांच्या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधून विदयार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाची माहिती घेण्यात आली.

17) कार्यानुभव विषय उपक्रम - या उपक्रमांतर्गत विविध घराच्या शोभेच्या वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी सांगण्यात आले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध कार्यानुभव अंतर्गत वस्तू तयार केल्या.





18) swadhyay उपक्रम - स्वाध्याय उपक्रमातील प्रश्न विद्यार्थ्याकडून नियमित सोडवून घेण्यात आले.  त्यांचा 

 आढावा दर शनिवारी घेण्यात येतो. 




19) गोष्टीचा शनिवार - या उपक्रमतील pdf स्वरूपातील गोष्ट  व टास्क व्हाट्स ऍप वर पाठवण्यात येते व त्यांचा आढावा दर शनिवारी घेण्यात येतो.

20) missed call दया आणि गोष्ट ऐका - शासनाचा हा उपक्रम विद्यार्थ्याच्याकडे जरी अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसला तरी 08033094243 या क्रमांकावर missed call करून गोष्ट ऐकतात. 

या प्रकारे आम्ही आमच्या शाळेत lockdown च्या काळात विविध उपक्रम covid -19 चे निर्देश पाळून विदयार्थ्याना गुंतवून ठेवण्यात आले.

या मध्ये आमच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. केशरीलालजी पटले व सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. सी. मेळे शिक्षिका कु. सुनीता टेकूळे, सौ. वर्षाताई बावनथडे शिक्षक विकास लंजे यांच्या प्रयत्नामुळे सर्व उपक्रम यशस्वी केले.


No comments:

Post a Comment