Thursday, February 25, 2021

शाळा बाहेरची शाळा आकाशवाणी कार्यक्रम

 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी पं. स.आमगाव, जि. प. गोंदिया येथील एकता बिसेन बोलणार आकाशवाणीवरून* 


 *शाळा बाहेरची शाळा (भाग 107)* येत्या *शनिवार दि. 20/02/21* ला सकाळी ठीक 10.30 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमामध्ये दिलेल्या अभ्यासावर बोलण्याची संधी *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी येथील वर्ग तिसरीतील विद्यार्थीनी _एकता संजय बिसेन_*  हिला  मिळालेली आहे. तेव्हा सर्वांनी ही चिमुकली अभ्यास कशी करते, तीचे भविष्यातील स्वप्न काय ,अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी हे प्रसारण नक्की ऐकावे तसेच  सर्वांना ऐकायला सांगावे. 

मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर, नागपूर, प्रथम एजुकेशन फाउंडेशन आणि जि. प. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने. शाळा बाहेरची शाळा हा कार्यक्रम दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ला  आकाशवाणी नागपूर वरून प्रसारित केला जातो.

हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास नियमित पोहोचविले जात आहेत. या उपक्रमाच्या अनुषंगाने आज दिलेल्या अभ्यासावर उद्या सकाळी 10.30 वाजता आकाशवाणीच्या नागपूर 'अ' (512.8) केंद्रावरून प्रसारित केला जातो .

 *'प्रथम महाराष्ट्र'* अँप द्वारे थेट प्रसारण ऐकण्यासाठी *‘थेट रेडीओ प्रक्षेपण’* हा टॅब निवडू शकता. अँप वर सदरील कार्यक्रम नेहमी प्रमाणे सकाळी 10:30 वाजता प्रसारित होईल. अँप ची लिंक पुढील प्रमाणे आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.pratham.maharashtra

 *सन्मा. मेश्राम साहेब गट शिक्षणाधिकारी आमगाव यांच्या प्रेरणेने तालुक्यात हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी चे मुख्यध्यापक व आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. एम. सी. मेळे, शिक्षक कु. सुनीता टेकुळे,सौ. वर्षा बावनथडे, विकास लंजे यांनी ऐकता बिसेन व तिच्या पालकांचे मनस्वी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्यात.*

No comments:

Post a Comment