Friday, March 20, 2020

कोरोनाच्या साथीमुळे शाळेला सुट्ट्या आहेत. मुले घरीच आहेत. अशावेळी काय करता येईल ? या काळात किशोर मासिक आपल्या मदतीसाठी तयार आहे. १९७१ सलापासूनचे किशोरचे अंक ऑनलाईन मोफत उपलब्ध आहेत. तब्बल ३२ हजार पानांचे रंगीबेरंगी साहित्य इथे उपल्बध आहे. कथा, कविता,ललित लेख, एकांकिका, नाट्यछटा,चित्रकथा, कोडी आणि हजारो चित्र यांचा हा खजिना आहे. हे साहित्य आपापल्या मुलांना उघडून द्या. ऑनलाईन डाउनलोड करा किंवा प्रिंट काढून द्या.त्यातील गोष्टी, कविता वाचून दाखवा. त्यावर चर्चा करा. एकत्र बसून कोडी सोडवा. वेळ कसा जाईल हे कळणार पण नाही. सोबत लिंक ...

http://kishor.ebalbharati.in/Archive/

No comments:

Post a Comment