Saturday, May 6, 2023

वार्षिक परीक्षा निकाल 2022-23

 सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दि.06/05/2023 ला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त निकाल जाहीर करण्यात येत आहे.


विद्यार्थी खालील लिंक द्वारे आपला निकाल बघू शकतील.तसेंच शाळेत येऊन आपली गुणपत्रक घेऊन जावे.


- मुख्याध्यापक


जि. प. प्राथ. शाळा बिरसी पं. स. आमगाव जि.पं. गोंदिया






इयत्ता पहिली

Result 1 st Class

इयत्ता दुसरी

Class 2 nd 1 सेम

इयत्ता तिसरी

Result 3 rd Class

इयत्ता चौथी

Result 4 th Class

इयत्ता पाचवी

Result 5 th Class


टिप -- Mobile किंवा computer मध्ये ISM फॉन्ट असायला हवा 

Thursday, April 27, 2023

शाळेतील पहिले पाऊल

 आज दि.27/04/2023 ला *जि. प प्राथ. शाळा बिरसी* येथे शाळा प्रवेश पहिला मेळावा *मा. पूनमताई सोनवाने अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बिरसी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला*. या कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे *मा. पी. के.चौधरी माजी सरपंच बिरसी, मा. केशरीलाल पटले, मा. झूलेश्वरिताई रहांगडाले, मा. शिलाताई बहेकार, मा. सुनिता सोनवाने, मा. दुर्गा रहांगडाले, मा. कल्पना बोपचे, मा. एम. सी. मेळे, मा. वर्षाताई बावणथडे,मा. सुनिता टेकूळे मा. उमनताई रहांगडाले, मा. कविता खोब्रागडे, मा. ममता चौधरी* व इयत्ता पहिल्या वर्गात भरती झालेले 20 विद्यार्थी व त्यांच्या माता पालक उपस्थित होत्या.


सर्व प्रथम *मा शारदा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. *मा. मेळे सर* यांनी या मेळाव्याची रूपरेषा समजावून सांगली व प्रत्येक स्टॉल वर असणाऱ्या विविध बाबी समजावून सांगितल्या, *मा. पि. के. चौधरी* यांनी माता पालकांचे जबाबदारी व कार्य विषद केले.

*मा. पूनमताई सोनवाने* यांनी येणाऱ्या आठ आठवड्यात करावयाची कार्यवाही विषद केली.

या कार्यक्रमाचे संचालन *विकास लंजे* तर आभार *वर्षा बावनथडे* यांनी मानले.


या कार्यक्रमात एकूण 20 विद्यार्थी व पालक सहभागी झाले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी 

यु-डायस :-27110200801

मेळावा दिनांक:-27/04/2023

बालके :-20

पालक :-20

शिक्षक:-04

अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका:-02

स्वयंसेवक:-05

लोकप्रतिनिधी:-10










Wednesday, March 8, 2023

जागतिक महिला दिन

 आज दि.08 मार्च 2023 ला जि. प. प्राथ. शाळा बिरसी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. झूलेश्वरीताई रहांगडाले, प्रमुख पाहुणे म्हणून पूनमताई सोनवाने,शिलताई बहेकार, मा. गंगाताई रहांगडाले, मा. दुर्गाताई रहांगडाले, मा. सुनिताताई सोनवाने, मा. ममताताई चौधरी, मा. कल्पनाताई बोपचे, मा. वर्षाताई बावणथडे, मा. सिंधुताई रहांगडाले, मा. सुनिताताई टेकूळे,मा. अनिताताई पंधरे, मा. मीराताई खुळसुंगे,मा. एम. सी. मेळे सर, मा. विकास लंजे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमात महिलांचे विविध खेळ घेण्यात आले.सर्व उपस्थित महिलांना शाळेतर्फे महिला दिनानिमित्त भेट वस्तू देण्यात आली.


शेवटी सर्वांना बेसन भात व गोड जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








मा. एम. सी. मेळे सर मुख्याध्यापक यांचा वाढदिवस

 आज दि 06/03/2023 ला जि. प. प्राथ. शाळा बिरसी येथे *मा. एम. सी. मेळे सर मुख्याध्यापक* जि. प. प्राथ. शाळा बिरसी येथे साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे *अध्यक्ष मा. पूनमताई सोनवाने तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. झूलेश्वरिताई रहांगडाले, मा. गंगाताई रहांगडाले, मा. सुनिताताई सोनवाने, मा. कल्पनाताई बोपचे, मा. केशरीलालजी पटले, मा. सुनिता टेकूळे, मा. वर्षाताई बावणथडे, मा. सिंधुताई रहांगडाले, मा. विकास लंजे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*

 सर्वप्रथम मा. एम. सी. मेळे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने *सामान्य ज्ञान परीक्षेचे* आयोजन करण्यात आले.त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. व त्यांना बक्षीस देण्यात आला.

यानंतर शालेय आवार स्वच्छ करून परिसरातील *कचऱ्याची होळी करण्यात आली व होळीच्या रंगारंग शुभेच्छा* देण्यात आल्या.


शेवटी सर्वाना *गोड जेवण* देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.











शाळा सिद्धी बाह्य मूल्यांकन

 आज दि.02/03/2023 ला जि. प. प्राथ. शाळा बिरसी येथे *शाळासिद्धी बाह्यमूल्यांकन* करण्यात आले.


बाह्यमूल्यांकन करण्यासाठी निर्धारक म्हणून *मा.वशिष्टजी खोब्रागडे* साधनव्यक्ती BRC आमगाव व *मा. एम. एम. राऊत सर* केंद्रप्रमुख आंजोरा हे होते.


निर्धारकांनी शाळासिद्धी चे *एकूण सात क्षेत्रात* मूल्यांकन केले. यासाठी त्यांनी शाळेचे *सम्पूर्ण रेकॉर्ड, पुरावे, दाखले तपासले तसेच प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थांची गुणवत्ता* तपासून मूल्यांकन केले.


त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक *मा. एम. सी. मेळे शिक्षक मा. सुनिता टेकूळे, मा. वर्षा बावणथडे, विकास लंजे व सर्व विदयार्थी* उपस्थित होते.






छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव 2023

 *जि. प. प्राथ. शाळा बिरसी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.* या जयंती निमित्त शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे *अध्यक्ष मा.पूनमताई सोनवाने* प्रमुख पाहुणे मा. केशरीलालजी पटले, सुनिताताई सोनवाने, नागोरावजी सोनवाने, शिलाताई बहेकार, दुर्गा रहांगडाले, मुख्याध्यापक एम. सी. मेळे, शिक्षक सुनिता टेकूळे, वर्षा बावणथडे, विकास लंजे, सिंधू रहांगडाले व गावातील पालक मंडळी उपस्थित होते.


*सर्वप्रथम शिवाजी महाराज यांची रॅली गावातून लेझीम पथकद्वारे फिरविण्यात आली.* त्यामध्ये विविध देखावे दाखविण्यात आले.

त्यानंतर *बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला*. त्यात विविध पदार्थाचे स्टॉल विदयार्थ्यांनी लावले, पालकांनी खरेदी केले. या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी सर्व विद्यार्थी व पालकांनी सहकार्य केले.