*आज दि. 26/09/2019 ला जि.प.प्राथमिक शाळा बिरसी येथे मतदार जागृती SWEEP या कार्यक्रमांतर्गत नव मतदार व ज्या 4 स्त्रिया लग्न होऊन बिरसी येथे आल्या त्यांचे नाव बिरसी येथील मतदार यादित समाविष्ट झाले त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. त्याचप्रमाणे 8 मुली ज्या या वर्षी प्रथमच मतदान करणार आहेत, त्यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. त्याच वेळेस मतदार यादिचे वाचन सुद्धा करण्यात आले.*
*या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.एम.सी.मेळे सर,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ठाकूर सर, प्रा.अशोक बोरकर सर भवभूती महाविद्यालय आमगाव,श्री.पि.के.चौधरी माजी सरपंच बिरसी, सौ.वर्षा बावनथडे,कु.सुनीता टेकुळे,श्री.विकास लंजे तसेच सर्व भवभूती महाविद्यालय व बिरसी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.*
*या प्रसंगी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गावामध्ये जाऊन गावातील प्लास्टिक कचरा गोळा केला, शाळेच्या आवाराची स्वच्छता केली तसेच कुटुंब सर्वेक्षण करून विविध शासकीय योजनेचे माहिती दिली.*
*त्यानंतर नवीन मतदार याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे संचालन श्री.विकास लंजे तर आभार सौ. वर्षा बावनथडे यांनी मानले*