आज दि.27/04/2023 ला *जि. प प्राथ. शाळा बिरसी* येथे शाळा प्रवेश पहिला मेळावा *मा. पूनमताई सोनवाने अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बिरसी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला*. या कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे *मा. पी. के.चौधरी माजी सरपंच बिरसी, मा. केशरीलाल पटले, मा. झूलेश्वरिताई रहांगडाले, मा. शिलाताई बहेकार, मा. सुनिता सोनवाने, मा. दुर्गा रहांगडाले, मा. कल्पना बोपचे, मा. एम. सी. मेळे, मा. वर्षाताई बावणथडे,मा. सुनिता टेकूळे मा. उमनताई रहांगडाले, मा. कविता खोब्रागडे, मा. ममता चौधरी* व इयत्ता पहिल्या वर्गात भरती झालेले 20 विद्यार्थी व त्यांच्या माता पालक उपस्थित होत्या.
सर्व प्रथम *मा शारदा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. *मा. मेळे सर* यांनी या मेळाव्याची रूपरेषा समजावून सांगली व प्रत्येक स्टॉल वर असणाऱ्या विविध बाबी समजावून सांगितल्या, *मा. पि. के. चौधरी* यांनी माता पालकांचे जबाबदारी व कार्य विषद केले.
*मा. पूनमताई सोनवाने* यांनी येणाऱ्या आठ आठवड्यात करावयाची कार्यवाही विषद केली.
या कार्यक्रमाचे संचालन *विकास लंजे* तर आभार *वर्षा बावनथडे* यांनी मानले.
या कार्यक्रमात एकूण 20 विद्यार्थी व पालक सहभागी झाले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी
यु-डायस :-27110200801
मेळावा दिनांक:-27/04/2023
बालके :-20
पालक :-20
शिक्षक:-04
अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका:-02
स्वयंसेवक:-05
लोकप्रतिनिधी:-10